Ad will apear here
Next
दिव्यांग विद्यार्थ्यांचा दहीहंडी महोत्सव
ठाणे : 'बाळ गोपाळ मित्रमंडळा'च्या वतीने आठ ऑगस्ट रोजी शिवाजी मैदानावर `हिंदुहृदयसम्राट अवयवदान दिव्यांग दहीहंडी महोत्सव २०१७'चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला १५ शाळांमधील ६२७ विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि सहकारी, कर्मचारी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, अशी माहिती महोत्सवाचे आयोजक विलास ढमाले यांनी दिली.

प्रारंभी जैन धर्मगुरु जे. पी. गुरुजी यांच्या हस्ते दहीहंडीचे पूजन करून महोत्सवास प्रारंभ करण्यात आला. खासदार राजन विचारे यांनी या उत्सवात सहभागी होऊन दिव्यांग मुलांना प्रोत्साहन दिले. अवयवदान चळवळीचे प्रणेते विलास ढमाले यांच्यासह रंगारी, डॉ. मुकेश शेट्टे, डॉ. गुंजोटीकर, डॉ. हर्षद भोळे, डॉ. विद्या कदम, डॉ. अमित नाईक, डॉ. देढीया तसेच विजय सिंह, अमित टण्णू, अनिल उसपकर, हेमंत तांबटकर, सुरेश यादव आदी या वेळी उपस्थित होते.

'उमेद फाऊंडेशन'च्या उर्दू शाळेतील दिव्यांग मुलांचा सहभाग हे यंदाच्या महोत्सवाचे वैशिष्ट्य. याच शाळेतील अंध मुलगा शोएब या विद्यार्थ्याला हिंदुहृदयसम्राट अवयवदान दिव्यांग दहीहंडी फोडण्याचा मान मिळाला. सर्व सहभागी शाळांना रोख पारितोषिक, चषक देण्यात आले. उपस्थित मान्यवर डॉक्टरांच्या हस्ते ही पारितोषिके प्रदान करण्यात आली. तसेच, सहभागी विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.  उपस्थितांमधील १२४ जणांनी अवयवदानाचे फॉर्म भरून या उपक्रमाला हातभार लावला.

या दहीहंडी महोत्सवाचे यंदा २६वे वर्ष होते. यापूर्वी हा उत्सव ठाण्याच्या बाजारपेठेत `महासरस्वती दहीहंडी उत्सव' म्हणून १२ वर्षे  साजरा केला जात होता. त्यानंतर हा उत्सव `हिंदुहृदयसम्राट हृदयस्पर्शी अवयवदान दहीहंडी उत्सव' म्हणून साजरा करण्यास सुरूवात झाली आणि यंदा `हिंदुहृदयसम्राट अवयवदान दिव्यांग दहीहंडी महोत्सव' म्हणून साजरा करण्यात आला. यंदा अवयवदान दहीहंडी उत्सवाचे १४वे वर्ष होते.

या उत्सवामध्ये कोणत्याही प्रकारची थर लावण्याची स्पर्धा नसते. दिव्यांग मुलांच्या जीवनात जिद्द निर्माण व्हावी याकरिता तसेच, अवयवदानाबद्दल जनजागृती व प्रसार व्हावा यासाठी दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZNYBF
Similar Posts
ठाण्यात हिंदुहृदयसम्राट अवयवदान दिव्यांग दहीहंडी महोत्सव ठाणे : सालाबादप्रमाणे यंदाही नारळवाला चाळीमधील बाळगोपाळ मित्रमंडळाच्यावतीने ‘हिंदुहृदयसम्राट अवयवदान दिव्यांग दहीहंडी महोत्सव-२०१७’चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती या महोत्सवाचे आयोजक, अवयवदान चळवळीचे प्रणेते विलास ढमाले यांनी दिली आहे. या महोत्सवाला ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री
‘तरुण पिढीने अवयवदानाच्या जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा’ ठाणे : ‘आज अनेकांना अवयवांची आवश्यकता आहे. त्यामुळे आजच्या तरुण पिढीने अवयवदानाविषयी जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा,’ असे आवाहन ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी व्यक्त केले.
ठाण्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना मिळणार गती ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात खासगी व लोकसहभागातून उभारण्यात येणाऱ्या २० एमएलडी क्षमतेच्या पाणी विक्षारण आणि १० मेगावॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प या दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या सामंजस्य करारावर नुकतीच स्वाक्षरी करण्यात आली. अशा पद्धतीचे प्रकल्प राबविणारी ठाणे महानगरपालिका ही देशातील पहिली महानगरपालिका आहे
ठाणे शहरात आरोग्य शिबिरे,औषध फवारणी ठाणे :   नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीनंतर साथीचे आजार फैलावू नयेत, यासाठी ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी प्रत्येक प्रभाग समितीतंर्गत तातडीने आरोग्य शिबिरे घेण्याचे आदेश  दिले. त्यानुसार आरोग्य विभागाच्यावतीने शहरात ठिकठिकाणी जवळपास २२ आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language